कोंडले-मोरबे धरणात आढळला महिलेचा मृतदेह
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील कोंडले-मोरबे धरणात आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांना एका महिलेचा मृतदेह बांधलेल्या व फुगलेल्या अवस्थेत आढळून आला असून लांब केसावरुन सदर मृतदेह हा महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
येथील धारणातील पाण्यात रश्शीने गच्च बांधलेल्या व फुगलेल्या अवस्थेत एक मृतदेह तरंगत होता. त्या परिसरात वावरणार्या ग्रामस्थांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना झाले. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त, सहा.पोलीस आयुक्त व इतर गुन्हे प्रकटीकरण विभाग आदींचे पथक व अधिकारी घटनास्थळी जावून त्यांनी याबाबत अधिक माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. सदर महिलेला कोणत्या कारणासाठी मारण्यात आले असावे याचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.
फोटो ः मयत महिला.