सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार केवल महाडिक यांच्यावरराजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या महाराष्ट्र सहचिटणीसपदी धुरा पनवेल दि.18 (वार्ताहर)- गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेसह सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व गेल्या काही वर्षांपासून राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे केवल महाडिक यांच्यावरराजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या महाराष्ट्र सहचिटणीसपदी धुरा सांभाळण्यास देण्यात आली आहे. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे धडाडीचे नेतृत्व, व्यक्तिमत्व व तरुणांशी आपुलकीचे नाते जोडणारे केवल महाडिक यांची त्यांनी केलेल्या गेल्या वर्षभरातील कामाची पोचपावती म्हणून आज मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या आदेशाने व संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब व प्रकाशभाई कोळी, चंद्रकांत धडके मामा यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या महाराष्ट्र सहचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. फोटोः केवल महाडिक