तळोजा फेज 1 येथे रेल्वे फाटकावरील पर्यायी कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण व्हावे- प्रसाद ढगे पाटील व मंगेश नेरुळकर यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
पनवेल /वार्ताहर : तळोजा फेज 1 येथे बऱ्याच दिवसापासून भुयारी मार्गाचे काम चालू आहे, पर्यायी रस्ता म्हणून रेल्वे फाटकावरून वसाहत ते मुख्य हायवे असा कच्चा रस्ता आहे. मागील चार महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सहचिटणीस सामाजिक कार्यकर्ते प्रसाद ढगेपाटील व पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मंगेश वसंत नेरूळकर यांच्या पाठपुराव्याने दोनदा या कच्चा रस्त्याचे खडीकरण करण्यात आल परंतु पावसामुळे या रस्त्यावरील झालेले खडीकरण हे वाहून जाऊन वारंवार रस्त्यावर खड्डे पडले व सध्या या रस्त्याची पुन्हा दुरावस्था झालेली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण व्हावे अशी मागणी यापूर्वीच प्रसाद पाटील यांनी केली होती परंतु अधिकच्या पावसामुळे त्यावेळी डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करता येणार नाही असे रेल्वे प्रशासनाने त्यांना सांगितले होते. आता पावसाचे प्रमाण कमी आल्यामुळे जोपर्यंत भुयारी मार्ग चालू होत नाही तोपर्यंत या रस्त्याचे चांगल्याप्रकारे दुरुस्ती करण व्हावे आणि डांबरीकरणच करावे अशी मागणी प्रसाद पाटील यांनी केलेली आहे. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा रेल्वे अस्थपणा प्रशासकीय अधिकारी अशोक घुंमगावकर व शिवशंकर निंबेकर चालू असल्याची माहिती श्री प्रसाद पाटील व श्री मंगेश नेरुळकर यांनी वर्ल्ड फेमस न्यूज ला दिली.