आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मिरची गल्लीतील अत्याधुनिक अशा पुजारा सुपर मार्केटचा शुभारंभ
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः विविध साहित्याने व जीवनावश्यक वस्तूंनी नटलेल्या मिरची गल्लीतील प्रथम अशा पुजारा सुपर मार्केटचा शुभारंभ आज आ.प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेवक राजू सोनी उपस्थित होते.
सध्या डी-मार्ट, रिलायन्स फ्रेश, बिग बाझार आदी सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. याच ग्राहकांना वाजवी दरामध्ये तसेच वेगवेगळ्या आकर्षक स्ेिकमद्वारे विविध प्रकारचे जीवनावश्यक वस्तू एकाच दालनात उपलब्ध करून देण्याचे काम पुजारा कुटुंबियांनी केले असून मिरची गल्ली येथे प्रथमच असे अत्याधुनिक पद्धतीचे सुपर मार्केट दिनेश पुजारा, जितेंद्र पुजारा, प्रतिक पुजारा आदींनी एकत्र येवून सुरू केले असून त्याचा फायदा परिसरातील ग्राहकांना होणार आहे. या सुपर मार्केटमध्ये नवनवीन वस्तू नेहमीच उपलब्ध होणार असून त्यांचा विक्री दर हा बाजार भावापेक्षा कमी असल्याने तेथे खरेदी मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचप्रमाणे हजाराच्यावर खरेदीवर आकर्षक अशी सवलत या सुपर मार्केटमधील ग्राहकांना देण्यात येणार असल्याने निश्चितच आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी येथे होणार आहे.