महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने वाहनचालकांचे मोठया प्रमाणात प्रबोधन
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः राज्यातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता अप्पर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सपोनि सुभाष पुजारी, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खालापुर टोलनाका तसेच राष्ट्रीय महामार्ग क 66 व राष्ट्रीय महामार्ग क 48 येथे वाहतुकीचे नियम व नियमनाबाबत कार्यकम आयोजीत करण्यात आले त्या कार्यकमाअंतर्गत खालापुर टोलनाका, हमरापुर, कर्जत फाटा येथे अवजड वाहनांना थांबवुन रिफलेक्टर लावण्यात आले तसेच वाहतुक नियमांबाबतच्या माहितीबाबतची पत्रके वाटण्यात आली. जड अवजड वाहनांच्या चालकांना वाहने चालविताना पहिल्या लेनने वाहने न चालविता डावीकडील लेन मधुन वाहने चालविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वाहनचालकांनी रात्री व दिवसा त्यांचे वाहने रोडवर कडेला पार्किग न करता अधिक्त पार्किंग एरियामध्ये पार्किंग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच जमलेल्या वाहनचालकांना वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे टाळावे, सिट बेल्ट लावणे तसेच दुचाकी स्वारांना हेल्मेट परिधान करणेबाबत व भरधाव वेगाने चालणा-या वाहनांवर करण्यात येणा-या वेगमर्यादेच्या कारवाईबाबत बाबतची माहिती देण्यात येवुन इतरही वाहतुक नियंमांचे महत्व सांगुन त्यांचे पालन करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. वाहतुक नियंमांचे उल्लंघन केल्यामुळे होणा-या अपघाताबाबत माहिती देवुन अपघातसमयी मदत करण्याबाबत सुचना करण्यात आल्या वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणा-या दंडातम्क कारवा्ईबाबतची माहीती देण्यात आली महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे कडुन सदर उपकमामध्ये महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे अधिकारी व कर्मचारी तसेच आयआरबी टोलचे अधिकारी व कर्मचारी व वाहनचालक उपस्थित होते. महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे कडुन अपघात कमी व्हावे याकरीता वाहतुक नियम व नियमनाबाबत वेळोवेळी चौकसभा आयोजीत करुन तसेच वाहन पर्किंग स्थळे, कळंबोली ट्रक टर्मीनळ, लॉजीस्टीक्स येथे कार्यकम घेवुन वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात येत असते असे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे सहा.पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.