शिवशंभो प्रतिष्ठान च्या वतीने स्मशानभूमीची साफसफाई
शिवशंभो प्रतिष्ठान हे नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असते आष्टी तालुका येथील अंभोरा येथील स्मशानभूमीची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अंभोरा तालुका आष्टी येथील स्मशानभूमी मध्ये गवत उगवले होते अनेक प्रकारच्या वेली वाढल्या होत्या स्मशानभूमीतील अस्वच्छता पाहून शिवशंभो प्रतिष्ठान चे अध्यक्ष अॅड. शिवाजी अण्णा कराळे यांनी स्वखर्चातून चार हजार रुपये देऊन ही स्वच्छता मोहीम राबवली आहे कै.कौसाबाई विठोबा कराळे या त्यांच्या चुलती चे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले होते त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दहावा निमित्त ही स्वच्छता त्यांनी केली शिवशंभो प्रतिष्ठान च्या वतीने अंभोरा गावात मुलांना आयकार्ड वाटणे अॅड शिवाजी अण्णा कराळे यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यार्थ स्मशानभूमीत प्रवचनासाठी ओटा बांधणे वृक्षारोपण करणे अशा एक ना अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत त्या कामासाठी त्यांना गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव खाकाळ सुभाष आमले रामदास मुळीक महादेव आमले संतोष आटोळे महादेव पाडळकर सचिन ठाणगे कांतीलाल गर्जे बापूसाहेब फसले यांचे सहकार्य लाभत आहे