विक्रांत पाटील यांनी केलेल्या कामाचं नागरिकांकडून कौतुक माझा प्रभाग-माझी जवाबदारी
पनवेल / वार्ताहर : माझा प्रभाग-माझी जवाबदारी दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबई आणि कोकणपट्टी ला झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी साचलेले होते. याच अतिवृष्टी मूळे प्रभाग क्रमांक १८ मध्ये सुध्दा काही ठिकाणी पाण्याचा निचरा हळू हळू असल्याने काही सखल भागात पाणी साचले होते.याची महिती पहाटे चार वाजता प्रभागाचे नगरसेवक विक्रांत पाटील यांना मिळाली आणि तात्काळ ते कामाला लागले. प्रभागातील डायमंड पार्क,पारसमणी,नम्रता पार्क इ..ठिकाणी पाणी साठल्याने ते काढण्यासाठी लगेच तीन जनरेटर पंप लावून सकाळीच कामाला सुरुवात केली.कामाचं नियोजन लावत त्यांनी सगळीकडे पाहणी केली ज्या ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन होईल तेवढ्या लवकर पाण्याचा निचरा कसा व्यवस्थित होईल याच्याकडे जातीने लक्ष घातले.ठाना नाका इथे हायवेयलगत च्या नाल्यातुन पाण्याचा निचरा होत नव्हता तिथे जेसीबी लावून नाला साफ करून घेतला.रात्री उशिरा पर्यंत थांबून कामाची पाहणी केली आणि प्रभागातील नागरिकांना दिलासा दिला.माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने कृती करणारे विक्रांत पाटील यांनी केलेल्या कामाचं नागरिकांकडून कौतुक होत आहे.