गाडीची काच फोडुन मोबाईल चोरणा-या आरोपीला गुन्हे शाखा, कक्ष -२ पनवेलने केली अटक
पनवेल दि.26 (वार्ताहर)- गाडीची काच फोडुन मोबाईल चोरणा-या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखा, कक्ष -२ पनवेलने गजाआड केले असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पनवेलजवळील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात नव्याने झालेल्या दोन पदरी रस्त्यावर सकाळी व सांयकाळी लोकांची वॉकींगकरता मोठ्याप्रमाणात वर्दळ असते . सदर वॉकींग करीता येणारे लोक हे सोबत मोटार गाडी व मोटार सायकल घेवुन येत असतात. सदर ठिकाणी गाड्या पार्क करून लोक बॉकींग करत असतात. दरम्यान तेथे गाडीमधुन काही वस्तु चोरीस जात असल्याबाबत तक्रारी पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात येत होत्या. अशाचप्रकारे पुष्पकनगर , दापोली ता . पनवेल , जि . रायगड येथे पार्क केलेल्या गाडीची काच फोडुन गाडीवे नुकसान करून गाडीत असलेले १) I Phone 6 Pluse हा १०,000 / – रू किंमतीवा , २) One Plus 3T ५,००० /- रू किंमतीचा असे २ मोबाईल फोन्स चोरीस गेले होते. सदर प्रकाराबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, नवी मुंबई सह पोलीस आयुक्त डॉ . जय जाधव, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, प्रविण पाटील, सहा . पोलीस आयुक्त गुन्हे शाखा विनोद चव्हाण यांनी सदरचा गुन्हा विनाविलंब उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याच्या समांतर तपासा दरम्यान गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल येथील नेमणुकीतील पोशि प्रविण भोपी यांना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हददीत कर्नाळा स्पोर्टस क्लब जवळ या ठिकाणी संशयीत आरोपी नामे अनिल सुदाम म्हात्रे हा चोरलेले मोबाईल घेवुन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहीती गुन्हे शाखा कक्ष -२ पनवेलचे वपोनि व्हि.टि. कादबाने यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड, सहा . पोलीस निरीक्षक गणेश कराड व पथक यांनी कर्नाळा स्पोर्टस जवळ सापळा लावला असता आरोपी अनिल सुदाम म्हात्रे वय ३२ वर्षे रा . दुबे बिल्डींग, कंरजाडे हा मिळुन आला. त्यास गुन्हे शाखा , कक्ष २ पोलीसांनी ताब्यात घेवून त्याचेकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपीताने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे . तसेच त्याचे ताब्यात असलेला १) I Phone हा १०,000 / -रू किंमतीचा , २) One Plus 3T ५,००० / – रू किंमतीचा असे २ मोबाईल फोन्स एकुण १५,000 /- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरचा गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा , कक्ष २ , चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, सहा. पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक गणेश कराड , पोलीस हवालदार सचिन पवार, रणजित पाटील, सुनिल सांळुके, पद्मसिंग पवार, पोलीस नाईक सुनिल कुदळे, प्रफुल्ल मोरे, पोलीस शिपाई प्रविण भोपी , आणि पथक यांनी केलेली आहे.