कामोठे वसाहतीमधील शेकडो जणांनी घेतला हाती भगवा ध्वज
पनवेल दि.27 (वार्ताहर)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन आज कामोठे वसाहतीतील विविध पक्षातील शेकडो जणांनी भगवा ध्वज हाती घेऊन शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. त्यांचे स्वागत खा. श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेत केले.
खारघर येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यालयात जिल्हाप्रमुख शिरीष घरत व कामोठे शहरप्रमुख राकेश गोवारी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील व सामाजिक संस्थेतील शिवसेना भगवा ध्वज हाती घेऊन व भगवे गमछे घालून पक्षप्रवेश केला त्यामध्ये प्रामुख्याने बबन दादू गोगावले, उमेश खेडेकर, संतोष गोळे, संजय मालजी, अविनाश वळवे, नितीन बेंद्रे, चंद्रकांत गोगावले, गणेश खांडगे, हुसेन मोमीन, विकास साबळे, संजय जंगम, मनिष नाईक, धनंजय येवले, प्रथमेश थोरात, विकास शिर्के, प्रविण पिंगळे, भारत भादावकर, संदिप झावरे, सागर बोर आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यांचे स्वागत भगवा ध्वज हाती देऊन खा. श्रीरंग बारणे यांनी केले व त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवसेना नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे व प्रत्येकाला योग्य तोो न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले.
फोटोः कामोठे वसाहतीतील शेकडो जणांचा भगवा ध्वज हाती घेऊन शिवसेनेत जाहिर प्रवेश करून घेताना खा. श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत व कामोठे शहरप्रमुख राकेश गोवारी