मिरची गल्ली परिसरात आढळला मृतदेह
पनवेल, दि.30 (वार्ताहर)- पनवेल शहरातील मिरची गल्ली राम मंदिराजवळ एका इसमाचा मृतदेह सापडला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, उंची 167 सेमी, केस वाढलेले नाक सरळ, दाढी मिशी बारिक, चेहरा उभट, अंगाने बारिक असून उजव्या हाताच्या मनगटाला लाल धागा बांधलेला व उजव्या हाताच्या दंडाला काळ्या रंगाचा धागा बांधलेला आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-27452333 किंवा पोलिस नाईक अशफाक शेख याच्याशी संपर्क साधावा.