रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी होणाऱ्या BPCL प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येउ नये हि स्थानिकांची मागणी आहे.
- रसायनी /वार्ताहर: रायगड जिल्ह्यातील रसायनी पट्यात असणाऱ्या HOC च्या जागेत BPCL कंपनीचा नवा प्रोजेक्ट उभा राहत आहे.. जोपर्यंत ह्या भागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी होणाऱ्या BPCL प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येउ नये हि स्थानिकांची मागणी आहे.सदर विषया संदर्भात काल मंत्रालयात महाविकास आघाडी वंदनीय दि. बा. पाटील साहेब प्रकल्प ग्रस्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदाद पवार साहेब ह्यांच्यासह बैठक घेतली. ह्या बैठकीत जोपर्यंत जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम कंपनीकडून सुरू करण्यात येउ नये अशी मागणी प्रकल्पग्रस्त समितीने दिली. तसेच हि कामे सुरूच राहिल्यास त्या विरोधात तीव्र आंदोलन करून काम बंद पाडले जाईल असा इशाराही HOC कंपनीला प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष श्री. बबनदादा पाटील ह्यांनी दिला.सदर बैठकीसाठी आमदार श्री. बाळाराम पाटील, मा. आमदार, जिल्हाप्रमुख श्री. मनोहर भोईर, कॉंग्रेसचे जिल्हाप्रमुख श्री. आर. सी. घरत, कॉंग्रेसचे नेते श्री. महेंद्र घरत, तात्यासाहेब म्हसकर, रमेश पाटील, काशिनाथ कांबळे, एम. डी. माळी, अनंता पाटील, बळीराम कांबळे, दत्ता खाने, भौड, संतोष पांगत, राम माळी तसेच अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी तसेच नेते उपस्थित होते.