- कोरोनामूळे ग्रामीण भागातील नंदीबैलच्या गुबुगुबुचा आवाज हरपला.
कोरोनामुळे नंदीबैलाचा व्य व्यवसाय करणा-यावर उपासमारीची वेळ
मोलमजुरी करुन चालवितात कसाबसा उदरनिर्वाह
—————————————-
अंभोरा( प्रतिनिधी) संतोष आमले
दान देवाच्या नावाने आपल्यादेवाच्या नावानं भोळ्या भक्तांनाकेला दान दसपटीने कमवून पाचबोटांना केला दान
असे गीत म्ह्मणत बालगोपालांना रिजवणारे व भूत भविष्य सांगून थोरा मोठय़ांची मने जिंकून मिळेल ते पदरात पाडून घेणारे नंदीबैलवाले दिवाळी जवळ आली की गावात गावात फिरताना दिसतात .मात्र या नंदीबैलाच्या गुबुगुबुचा आवाज कोराोणामुळे हरवल्याचे दिसून येत आहे खास करुन आष्टी तालुक्यातील दौलावडगाव भागात तिरमली समाज नंदीबैल सभाळुन उपजिविका करणारा आहे. या भागात तिरमली वस्ती आहे पन्नास ते साठ कुंटुब या ठिकाणी राहतात..व नंदीबैलाचा उपजीविकेच्या आर्थिक साधनांवर कुर्हाड कोसळली आहे .व त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनाच्या आपत्तीमुळे फिरून लोकांची करमणुक करणारे बहुरूपी व नंदीवाले व इतर उपजीविका करणाऱ्याचे फिरणे पूर्णपणे बंद झाले आहे .
नंदीबैल घेऊन गावोगावी फिरणारी जमात आहे. ही मंडळी नंदीबैलाला सजवून दारोदारी नेतात आणि लोकांना त्यांचे भविष्य सांगून आपला चरितार्थ चालवितात. याविषयी लोकगीतेही प्रसिद्ध आहेत.
ढोलकीच्या तालावर घुंगरांच्या झंकार करीत नंदीबैल दारोदारी हजेरी लावतात अंगणात येताच स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतात अंगणात तुळस असेल तर तुळशीभोवती सुद्धा प्रदिक्षणा घालतात. सुरू होते . भुतभविष्य सांगुन माता माऊली कडुन पसा पसा धान्य गोळा करतात.नंदीबैलाला प्रश्न विचारुन
त्याच्याकडुन होकारार्थी नकारार्थी मान डोलावुन लोकांची करमणुक करतात. खास नंदीबैलाचं आकर्षणअसंत बालगोपाळांनां सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल काय हे बालगीत बालगोपाळांच्या ओठावर आल्याशिवाय राहत नाही.
मात्र या लोककलांच्या आयुष्याला गेल्या सहा महिन्यापासुन कोरोनाची नजर लागली आणी वशंपरापरात आलेल्या उत्पन्नाच्या साधनावर कु-हाड कोसळली.लोकांचे भविष्य सागणा-या या लोककलावंतचं स्वत:चेच भविष्य अंधकारमय झाले आहे.
आष्टी तालुक्यातील दौलावडगावपासुन 1 कि.मी .अंतरावर नंदीबैल साभळुन व्यवसाय करणारी कुटुब आहेत. कोरोणामूळे हा व्यवसाय पुर्णपणे बंद झाल्याने शेतक-याच्या येथे मोलमजुरीने जाऊन ते उदरनिर्वाह करीत आहे.