खांदा कॉलनी येथे आज खांदेश्वर बेरोजगार फेरीवाले संस्थेच्या माध्यमातून माता इंदूआई भगत डेली मार्केटचे उद्घाटन
पनवेल / वार्ताहर : खांदा कॉलनी येथे आज खांदेश्वर बेरोजगार फेरीवाले संस्थेच्या माध्यमातून माता इंदूआई भगत डेली मार्केट*चे उद्घाटन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार श्री. बबनदादा पाटिल ह्यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना काळात अनेकांच्या आर्थिक अडचणी समोर येत असताना भाजी विक्रेत्यांसाठी हक्काच्या ठिकाणाची उपाययोजना आज करण्यात आली.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख श्री. रामदासदादा पाटील, विधानसभा संघटक श्री. दिपकजी निकम, महानगरप्रमुख श्री. रामदासजी शेवाळे, युवासेना विधानसभा अधिकारी श्री. पराग मोहिते, उपमहानगरप्रमुख श्री. लिलाधर भोईर, शहर प्रमुख श्री. सदानंदजी शिर्के, उपविधानसभा अधिकारी श्री. सुशांत सावंत, उपशहरप्रमुख श्री. दत्तात्रेय म्हामुणकर, विभागप्रमुख श्री. जयंतजी भगत, शिव सहकार सेना जिल्हा सचिव श्री. संपतजी सुवर्णा तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.