- पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी एमआयडीसी विभागीय जनसंपर्क कार्यालयाच उद्घाटनपनवेल /वार्ताहर: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पनवेल विधानसभा युवक यांच्या एमआयडीसी विभागीय जनसंपर्क कार्यालय ढोंगऱ्याचापाडा पनवेल महानगरपालिका क्षेत्र येथील माननीय नामदार आदीतीताई तटकरे पालकमंत्री रायगड जिल्हा यांच्या हस्ते पार पडला.
सदर कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, रायगड जिल्हा विधानसभा युवक अध्यक्ष अंकित साखरे, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील ,कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी, पनवेल विधानसभा अध्यक्ष दर्शन ठाकूर , पनवेल विधानसभा युवक अध्यक्ष सुनील ढेंबरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.या वेळी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पनवेल येथील कार्यकर्त्यांचा कार्याचा आढावा घेतला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहरातील विकासात योगदान व माननीय लोकनेते सुनील तटकरे साहेब यांचे पनवेलचे विकासामधील योगदान याची थोडक्यात माहिती कार्यकर्त्यांना दिली महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप म्हात्रे यांनी एमआयडीसी विभागातील पाण्याचा प्रश्न, डोंगऱ्याचा पाडा येथील रस्त्याचे रुंदीकरण, वलप गावचा पाण्याचा प्रश्न, शहरी भागातील विकासाच्याआड येणाऱ्या समस्या पालकमंत्र्यांना सांगून त्यासंदर्भात निवेदने दिली. सन्माननीय पालकमंत्र्यांनी त्यासंदर्भात सकारात्मक दृष्टिकोन दाखवून तात्काळ प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.मास्क वाटपाच्या उपक्रमाचे अनावरण*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खारघर विभागीय अध्यक्ष श्री सुरेश रांजवन यांच्या माध्यमातून संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सामान्य जनतेला मास्क वाटप या उपक्रमाचे अनावरण माननीय नामदार आदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
नामदार आदितीताई तटकरे यांच्या कडून मेहनती युवा कार्यकर्त्यांचे कौतुक
कोरोना संक्रमणाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी जनसेवेसाठी विविध उपक्रम राबवून पनवेलच्या लोकांना सुविधा देण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल व पक्षवाढीसाठी युवकांनी केलेले प्रयत्न याबद्दल पालकमंत्र्यांनी युवकांची विशेष कौतुक केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या या कार्यक्रमामध्ये श्री विशाल पाटील यांना पनवेल विधानसभा प्रभाग क्रमांक 2 च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल *विधानसभा युवक चे सचिव प्रभाकर फडके, पनवेल विधानसभा एमआयडीसी अध्यक्ष अनिल डोंगरे, विशाल पाटील, राहुल फडके* यांनी अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने व सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून केले. या कार्यक्रमाला पनवेल शहर जिल्हा सहसचिव प्रसाद पाटील , जिल्हा उपाध्यक्ष आर एन यादव, जिल्हा सहसचिव कृष्णा मर्ढेकर, पनवेल शहर जिल्हा युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष मंगेश नेरूळकर, पनवेल शहर जिल्हा युवक सचिव नारायण गायकवाड, डॉ विशाल माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी महेश पाटील बजरंग म्हात्रे, आशीर्वाद पाटील, संदीप ह. म्हात्रे, विकास पाटील, विनोद सुपे, श्रीरंग डोंगरे व राहूल डोंगरे त्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली