मुंबई-गोवा महामार्गाजवळील कर्नाळा खिंडीजवळ एक गॅस टँकर पलटी ; क्लिनर जखमी
पनवेल दि. ०५(वार्ताहर)ः पनवेलजवळील मुंबई-गोवा महामार्गाजवळील कर्नाळा खिंडीजवळ एक गॅस टँकर पलटी झाल्याने काही प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती, तर सदर टँकरचा क्लिनर जखमी झाला असून त्याला एमजीएम कामोठे येथे उपचारार्थ दाखल केले आहे.
पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे गॅस टँकर येत असताना एका वळणावर अचानकपणे टँकरचालकाचा ताबा सुटून सदर टँकर बाजूला पलटी झाला. यामुळे काही काळासाठी वाहतुक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पळस्पे वाहतुक शाखेचे पथक, पनवेल नवीन तालुका पोलीस ठाण्याचे पथक व अग्निशामक दलाचे बंब पोहोचले होते व त्यांनी क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला केला. या घटनेत टँकरचा क्लिनर जखमी झाला आहे.
