दिव्यांग व्यक्तींचे स्वयंरोजगार स्टॉलचे सर्वेक्षण करून भाडे करार करून कायमस्वरूपी करण्याबाबतची खा. श्रीरंग बारणे यांच्याकडे दिव्यांग बांधवांनी केली मागणी
पनवेल दि.06 (वार्ताहर)-दिव्यांग व्यक्तींचे स्वयंरोजगार स्टॉलचे सर्वेक्षण करून भाडे करार करून कायमस्वरूपी करण्याबाबतची मागणीखा. श्रीरंग बारणे यांच्याकडेदिव्यांग बांधवांनी केली आहे. पनवेल येथील खा. श्रीरंग बारणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिव्यांग बांधवांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपमहानगरसंघटक गुरूनाथ पाटील उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधवांच्या वतीने बोलताना दिनेश वाईकर यांनी सांगितले की, पनवेल शहरातील भारत नगर झोपडपट्टी, पटेल मोहल्ला येथील दिव्यांग प्रकार अस्थिव्यंग 88 टक्के दिव्यांग आहेत. त्यांना कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीत वैयक्तिक स्वयंरोजगार निर्मित करीत आहेत. याकरीता दिव्यांग स्वयंरोजगार स्टॉल कर्ज घेऊन घेतले आहेत. सदर स्टॉल पनवेल महानगरपालिकेने इतर दिव्यांग बांधवांप्रमाणे यास्टॉलचे सर्वेक्षण करून भाडे करार करून कायमस्वरूपी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या मागणीला खा. श्रीरंग बारणे यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या संदर्भात लक्ष घालून तातडीने ही समस्या सोडवितो असे आश्वासन दिले आहे. फोटोः खा. श्रीरंग बारणे यांची भेट घेताला दिव्यांग बांधव सोबत उपमहानगर संघटक गुरूनाथ पाटील आदी