शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे सदस्य नोंदणी अभियानास सुरवात..
पनवेल/ प्रतिनिधी : शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे आज दि.६ ऑक्टोबर रोजी जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, शिरीष बुटाला व शहरप्रमुख अच्युत मनोरे यांच्या उपस्थितीत प्राथमिक सदस्य नोंदणीची सुरुवात करण्यात आली.
तसेच यावेळी शिवसैनिक व पदाधिकार्यांना प्राथमिक सदस्य नोंदणी (२०२० -२०२२) अर्जाचे वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे पनवेल उपविभाग संघटक जुनेद पवार यांच्या तर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सदस्य नोंदणी अभियानास शहर संघटक प्रविण जाधव, उपशहरप्रमुख अनिल कुरघोडे, राहुल गोगटे, महिला तालुका संघटक प्रमिला कुरघोडे, उज्वला गावडे,रुही सुर्वे, ग्राहक कक्षाचे कुणाल कुरघोडे, विभाग प्रमुख सुजन मुसलोंडकर,नंदू घरत, उपविभाग प्रमुख बाळा शेट्ये, कुशल भगत, उपविभाग संघटक जुनेद पवार, वाईकर, शाखाप्रमुख चंद्रकांत शिर्के, राजेश शेट्टीगार,आनंद घरत, आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.