अशोक दुधे रायगडचे नवे पोलीस अधीक्षक, अनिल पारस्कर यांची बदली
पनवेल / वार्ताहर : रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी रायगडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाच्या गृह विभागाकडून आज (7 ऑक्टोबर) भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांची बदलीने पदस्थापना करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशानुसार रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी रायगडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक यांच्या आदेशानंतर संबंधीत नियंत्रक अधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन, संबंधित अधिकारी यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरिता कार्यमुक्त करावे व त्यानंतर संबंधित अधिकारी यांनी बदलीच्या पदावर रुजू होऊन तसा अहवाल शासनाला सादर केला आहे