भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांनी आपला जुलै २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीचा कार्यअहवाल सादर केला.
पनवेल / वार्ताहर : भाजप महाराष्ट्र कार्यसमिती च्या बैठकी प्रसंगी,भाजयुमो महाराष्ट्र च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरात गेल्या तीन महिन्यात म्हणजेच जुलै २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीत केलेल्या कार्याचा अहवाल माजी मुख्यमंत्री , महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र जी फडणवीस यांना भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री विक्रांतजी पाटील यांनी सादर केला.
प्रदेश कार्यकरणी गठन ते मराठवाडा,पुणे शहर व ग्रामीण सह कोल्हापूर ग्रामीण दौरा याची सर्व माहिती कार्यावहलात देण्यात आली आहे.