ज्युपिटर मोटार सायकलची चोरी
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः राहत्या घरासमोर उभ्या करून ठेवलेल्या ज्युपिटर मोटार सायकलची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना तालुक्यातील कोळखे येथील ओएनजीसी कॉलनीमध्ये घडली आहे.
सुरज गुप्ता यांनी त्यांची ज्युपिटर टीव्हीएस मोटार सायकल एमएच-43-बीडी-3503 ही राहत्या घरासमोर उभी करून ठेवली असता सदर गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.