महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मा.डॉ.दिगंबर प्रधान (आय.पी.एस.) यांचा सत्कार संपन्न
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे व महामार्ग पोलीस, पनवेल विभाग यांच्या वतीने महामार्ग पोलीस, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान (आय.पी.एस.) यांना त्यांचे सेवेला भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस.) दर्जा मिळाल्या बद्दल पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर व सुभाष पुजारी सहा.पोलीस निरीक्षक यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
मा.डॉ.दिगंबर प्रधान (आय.पी.एस.) यांचे मुळ गाव सिध्दनेर्ली तालुका –कागल , जिल्हा कोल्हापुर येथील आहेत. त्यांनी आता पर्यन्त मिरज, सातारा, पुणे ग्रामीण, राज्य गुप्तवार्ता, कोल्हापुर येथे प्रभारी पोलीस अधीक्षक तसेच पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे व नाशिक या ठिकाणी उल्लेखनिय काम करून आपले कामाचा ठसा उमटविलेला आहे. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुर्ण करून मिरज वैदयकीय महाविदयालय येथून पदवी संपादन केली. व तगरी वैदयकीय सेवेला प्राधान्य दिले. व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे वैदयकीय अधिकारी म्हणुन 07 वर्षे चांगली सेवा केलेली आहे. जुन 2019 पासुन महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र येथे पोलीस अधीक्षक म्हणुन कार्यरत आहेत. महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र येथे त्यांनी चांगल्या कार्यक्षमतेने व स्वच्छ चारिञ्य जपत त्यांनी केलेल्या सेवेच चिज झाले. अशी समाजातुन व अधिकारी/कर्मचारी यांचेकडून प्रतिकीया उमटत आहे. महामार्ग परिक्षेत्र ठाणे येथे कार्यरत असताना त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसकडे बारकाईन लक्ष देवून वाहनांचे अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, अपघाता मध्ये मृत्युचे प्रमाण कमी व्हावे या दृष्टीने प्रयत्न केले. त्याकरीता रस्ते सुरक्षा अभियान, विविध उपकम राबवुन जनजागृती केली. तसेच कोकणातील गणेशोत्सवा करीता योग्य त्या बंदोबस्ताची आखणी केली व तळकोकणा पर्यंत वाहतुक कोंडीची होणार नाही याकडे लक्ष दिले. तसेच मुंबई पुणे एक्सप्रेसवर बोरघाट येथे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी अमृतांजन ब्रिज काढण्यासाठी योग्य परवानगी मिळविणे पासुन ते ब्रिज काढण्या पर्यन्त विशेष लक्ष दिले. देशावर आलेल्या कोरोना 19 या महामारीच्या काळामध्ये वाहतुक विभागातील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांची वेळोवेळी भेट घेवून कोरोना पासुन बचाव करण्यासाठी औषध उपचाराचा पुरवठा केला. कोरोना बाधीत पोलीस अधीकारी /कर्मचारी यांच्याशी नियमीत संपर्क साधुन धीर दिला. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या चांगल्या कामाची पोच पावती म्हणुन प्रोत्साहान मिळावे म्हणुन वेळोवेळी चांगल्या कामाची दखल घेवून उत्तेजनार्थ योग्य ते बक्षिस देवून सन्मान केलेला आहे. आजच्या या सत्कार कार्यकमासाठी पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, सुभाष पुजारी, सहा.पोलीस निरीक्षक, जगदिश परदेशी सहा.पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे व बोरघाट येथील कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बळ व देवदुत कर्मचारी योग्य ते अंतर ठेवून उपस्थित होते.
