रिक्षात बसून रोख रक्कम घेतली काढून
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः एका इसमास रिक्षात बसवून त्याची अंगझडती घेवून त्याच्याकडील 4 हजार रुपये रोख रक्कम काढून घेवून दोन अज्ञात इसम पसार झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
तळोजा येथे राहणारे बाळू बडेकर (70) हे पनवेल तहसील कार्यालयात रेशन कार्डच्या कामानिमित्त आले होते. त्यानंतर ते एस.टी.स्टॅण्डकडे निघाले असता त्यांच्याजवळ एक रिक्षा आली व उभी करून रिक्षा चालकाने रिक्षामध्ये साहेब बोलवतात असे सांगितले. ते आतमध्ये गेले असता तुम्ही नशा करता असे सांगून त्यांची अंगझडती घेवून त्यांच्या हातातील पेपर तपासून त्यांच्या खिशात असलेले 4 हजार रुपये काढून घेवून ते दोघेजण पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.