खांदा कॉलनी मधील विविध समस्यां सिडको ने त्वरित मार्गी लावाव्यात…..शिवसेना खांदा कॉलनी शिष्टमंडळाची मागणी
पनवेल / प्रतिनिधी : शिवसेना खांदा काॅलनी चे धडाडीचे कार्यतत्पर शहरप्रमुख सदानंद शिर्के साहेब यांनी आज खांदा काॅलनी मधील विविध समस्या संदर्भात पनवेल विधानसभा संघटक श्री दिपक निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे अधिकारी अभियंता अधिक्षक श्री रोकडे साहेब यांची भेट घेतली यावेळी सिडकोचे उप अभियंता मुलांनी साहेब, टेकाडे साहेब, भालचंद्र साहेब उपस्थित होते यावेळी शहरप्रमुख सदानंद शिर्के साहेब यांनी खोदलेले रस्ते,पावसाळी गटार ची साफसफाई,सेवर लाईन चे पाणी व्यवस्थित निचरा होत नसल्याबद्दल व खांदा कॉलनी मधील सर्व गार्डन ची सुशोभीकरण व डागडुजी अशा सर्व समस्या संदर्भात लेखी निवेदन देऊन सविस्तर विचारविनिमय करून सदरहू कामे दसरा सणापुर्वी करून घेतली पाहिजे अशी मागणी केली व तसेच आश्वासन घेतले यावेळी सदरहू शिष्टमंडळ सोबत उपशहरप्रमुख दत्तात्रेय महामुलकर, शहरसंघटक संतोष जाधव, उपशहरसंघटक संजीव गमरे, विभाग संघटक श्रीहरी मिसाळ, उपविभागसंघटक शिवाजी बंडगर, शाखाप्रमुख से 5 सुनील औटी, से 9 पुंडलिक म्हात्रे,से 11 अतुल घुग, उपशाखाप्रमुख से 11गणेश साबळे व शिवसैनिक संपत सुवर्णा इ . हजर होते*