महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने वाहनचालकांना मास्क व सॅनीटायझर्सचे तसेच वाहतुक नियमाांबाबत पत्रके वाटप करुन वाहनचालकांचे मोठया प्रमाणात प्रबोधन
वाहनचालकांचे वाहतुक नियमांबाबत प्रबोधन व्हावे याकरीता श्री . भुषण उपाध्याय सो . अप्पर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई , यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे श्री . विजय पाटील , पोलीस अधीक्षक ( मुख्यालय ) व डॉ.दिगंबर प्रधान , पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.सुदाम पाचोरकर पोलीस निरीक्षक महामार्ग पनवेल व सपोनि सुभाष पुजारी , महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे मार्फत खालापुर टोलनाका येथे वाहनचालकांना फेसमास्क व सॅनिटायझर्स चे वाटप करण्यात आले तसेच वाहतुक नियमांबाबतच्या माहितीबाबतची पत्रके वाटप करीत वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणा – या अपघाताबाबत माहिती देवुन अपघातसमयी मदत करण्याबाबत सुचना दिल्या तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणा – या दंडात्मक कारवाईबाबतची माहीती देवुन वाहनचालकांचे मोठया प्रमाणात प्रबोधन करण्यात आले . यावेळी पोलीस निरीक्षक श्री.सुदाम पाचोरकर , सपोनि सुभाष पुजारी , पोउपनिरीक्षक काकडे व पोलीस कर्मचारी स्टाफ हजर होते असे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे सहा.पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले .