श्री महाकाली देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरती संग्रह 2020 पुस्तिकेचे प्रकाशन
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः खारघर येथील श्री महाकाली देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही आरती संग्रह 2020 पुस्तिकेचे प्रकाशन शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्यासह आयोजक उपमहानगर संघटक गुरुनाथ पाटील, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाकक्षप्रमुख शशिकांत डोंगरे, युवा सेनेचे नरेश ढाले आदी उपस्थित होते. या पुस्तिकेचा फायदा नवरात्रौत्सवात अंबेमातेच्या भक्तांना होईल, असे प्रतिपादन प्रकाशनच्या वेळी जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी केले.