सीबीडी पोलीस ठाणे मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने सराईत आरोपी सलमान कीफायतुला खान याला पकडेले, अनेक गुन्हे उघडकीस
बेलापूर / वार्ताहर : सीबीडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १५४/२०२० भादवि कलम ४५४,४५७,३८० या गुन्ह्याचा डॅा.बी.जी. शेखर पाटील अपर पोलीस आयुक्त सो , प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त सो व विनोद चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी नमूदचा गुन्हा उघडकीस आणने बाबत सुचना केल्या होत्या .
मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू असताना मध्यवर्ती कक्षाचे पो शि राहुल वाघ यांना नमूद गुन्ह्यातील आरोपी बाबत मिळालेल्या खात्रीशिर माहिती वरून मध्यवर्ती कक्षाचे स.पो.नि राजेश गज्जल पो.ना.कोपरकर यांनी अत्यंत शिताफीने सराईत आरोपी
१) सलमान कीफायतुला खान वय 45 वर्ष रा.मानखुर्द मुंबई
२) सत्यम केशव हरिजन वय वर्ष 22 रा. नालासोपारा यांना लोणावळा येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी केली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेनंतर त्यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या १० सॅमसंग कंपनीच्या टीव्ही पैकी ९ टीव्ही हस्तगत हस्तगत करणेत आलेले आहे .
तसेच आरोपी क्रमांक
२) सत्यम केशव हरिजन हा
NRI पोलीस ठाणे गु.रजि. नं.२४/२०२० भादवि कलम ३७९ (मंदिरातील चोरी ) यामध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असुन त्यांचा आणखी काही गुन्ह्यांत सहभागा बाबत अधिक तपास मध्यवर्ती कक्ष करत आहेत.