कामोठे येथील व्यापारी बांधवांचा भाजपा मध्ये प्रवेश जाहीर प्रवेश…
कामोठे येथील अनेक व्यापारी बांधवांनी देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.हे सर्व व्यापारी बांधव भाजपाच्या व्यापारी प्रकोष्ठामध्ये कार्य करणार आहेत.
या कार्यक्रमात भाजपा जिल्हा अध्यक्ष सन्मा.आ.प्रशांत जी ठाकूर , कोकण म्हाडा चे मा.सभापती सन्मा. श्री बाळासाहेब जी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन नमो नमो मंचाचे अध्यक्ष श्री.आर के दिवाकर,उपाध्यक्ष संतोष शर्मा व सहकाऱ्यांनी केले होते.
या वेळी मनोगत व्यक्त करताना सन्मा. बाळासाहेब जी पाटील यांनी उपस्थितांना भारतीय जनता पार्टी विचारधारा, पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांच्या कर्तृत्वाचा झंझावात आणि आगामी काळातील कार्य पद्धती याबद्दल मार्गदर्शन केले तसेच प्रवेश करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.