राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल जिल्हा प्रभारी अजय आवटे यांचे स्वागत
कामोठे येथे पार पडलेल्या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
पनवेल परिसरात पक्ष अधिक बळकट करण्याबाबत चर्चा
पनवेल /प्रतिनिधी:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनियुक्त पनवेल जिल्हा प्रभारी अजय आवटे यांचे पनवेल या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. कामोठे येथे झालेल्या बैठकीत आवटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आगामी काळात या भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली. नवीन प्रभारी आवटे यांनी पहिल्याच भेटीत सर्वांना जिंकून घेतले, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यामध्ये एक प्रकारे नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने महाराष्ट्रभर तरुणांची मोठी फळी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत. प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह प्रदेश पदाधिकाऱ्यांनी याकरता कंबर कसली आहे. दरम्यान प्रत्येक जिल्हानिहाय नव्याने प्रभारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवे प्रभारी म्हणून कार्यक्षम आणि कार्यतत्पर प्रदेश पदाधिकारी अजय आवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी आवटे यांनी पनवेल येथे येऊन निवडक पदाधिकार्यांशी चर्चा केली. कामोठे येथे यासंदर्भात एक बैठक घेण्यात आली. या भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून नेमक्या काय उपाययोजना कराव्या लागतील याविषयी प्राथमिक चर्चा करण्यात आली. पक्षाचे ध्येय धोरण जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने प्रयत्न करणे आवश्यक आहे याविषयी अजय आवटे यांनी माहिती दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ओळख त्याचबरोबर त्यांचे म्हणणे तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी नवीन प्रभारी आवटे यांनी जाणून घेतल्या येत्या काही काळात पनवेल परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात तरुणांची मोठी फळी उभारली जाईल. असेही अजय आवटे म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष प्रमोद बागल, कार्याध्यक्ष शहाबाज पटेल, मंगेश नेरुळकर, संदीप म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.