वहाळ येथे कचऱ्याच्या ढीगाऱ्यात सापडली शेकडो आधार कार्ड. राजे प्रतिष्ठानतर्फे प्रकार उघडकीस.
पनवेल / प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील उलवा नोड परिसरात शेकडो आधार कार्ड कचऱ्याच्या ढीगाऱ्यात आढळल्याचा धक्कादायक प्रकार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी नुकताच उघडकीस आलाय. पोस्टाच्या अनागोंदी कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ढीगाऱ्यातील सर्व आधारकार्ड हे सेक्टर १९ व परिसरातील रहीवाशांची आहेत. मार्च महिन्यापासून त्यांना ही कागदपत्र पोस्टाकडून मिळणं अपेक्षित होतं. मात्र मार्च महिन्यानंतर आजतागायत नागरिकांना आधारकार्ड मिळालेले नाहीत. वहाळ येथील सेक्टर १९ मधील नागरिकांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी आधारकार्ड पडलेले दिसून आले यावेळी येथील नागरिकांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांना संपर्क केला व याबाबत माहिती दिली त्यानुसार महाडिक यांनी याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व आधारकार्ड ताब्यात घेऊन थेट पोस्ट ऑफिस गाठले व याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली व या प्रकरणी जबाबदार पोस्ट मास्टरला किंवा संबधित अधिकाऱ्यांवर व पोस्ट्मन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे. मिळालेले सर्व आधारकार्ड आम्ही ताबडतोब त्या पत्त्यावर नागरिकांच्या स्वाधीन करू अशी ग्वाही देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे.