उरण- पनवेल परिसरात अवजड वाहतुकीच्या समस्येवर तातडीने कारवाही करण्याची शिवसेना अवजड वाहतुकीची मागणी !
प्रतिनिधी : आज शिवसेना अवजड वाहतुकसेना रायगड तर्फे उरण, नाव्हाशेवा व JNPT आणि इतर उरण मधील कंटेनर यार्ड असलेल्या परिसरात होत असलेल्या अपघात, वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग, ओव्हरलोड वाहतूक समस्या, रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करणे व ह्याबाबत सर्व समस्या बाबत उरण तहसील कार्यालय, JNPT प्रशासन, उरण- नाव्हा शेवा पोलीस वाहतूक प्रशासन, RTO व संबंधित सर्व प्रशासनाला निवेदनाद्वारे जनतेला पडलेले काही प्रश्न विचारण्यात आले आहेत, अगदी फेरफटका मारला असता ह्या सर्व समस्या सामान्य जनतेला दिसत आहेत मात्र वाहतूक प्रशासन ह्या समस्यांकडे का कानाडोळा करत आहेत आणि ह्या बाबत प्रशासन केव्हा कारवाही करेल ? जनतेच्या पैशाने बनलेले रस्ते जनतेसाठी मुक्तपणे केव्हा वापरायला मिळणार ? सरकारी रस्त्यांवर बिनधास्तपणे कोणाच्या सांगण्यावरून गाड्या उभ्या असतात आणि त्यातून अपघात झाला तर कोण जबाबदार ?
देशभरातून आलेल्या वाहनांची योग्य तपासणी होत आहे का ?
असे काही प्रश्न ह्यावेळी लेखी स्वरूपात दिले आहेत !
ह्या जर सर्व अवैध गोष्टी असतील तर सदर गोष्टींवर प्रशासनाने तातडीने
येत्या १५ दिवसात काही ठोस कारवाही अशी मागणी शिवसेनेने केली आहे, अथवा शिवसेना ह्या बाबींवर अवजड वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रजित बल साहेब, उपाध्यक्ष सती साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष रुपेश पाटील साहेब व उपाध्यक्ष बी एन डाकी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करेल असे जाहीर करण्यात आले आहे !
ह्या वेळी अवजड वाहतूक शिष्टमंडळात पनवेल उपाध्यक्ष भानुदास कोळी, उरण विधानसभा अध्यक्ष मनोज घरत भाई, उरण तालूका प्रमुख चेतन पाटील, उपतालुका प्रमुख कुणाल पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष रोशन पवार, तालुका सचिव ठाकूर भाई, विनय पाटील, कुंदन पाटील, निकेश घरत आणि पदाधिकारी उपस्थित होते !!