जलप्रदूषण मधून होणार्या माश्यांच्या मृत्यूवर आणि मच्छीमारांच्या नुकसानीबाबत मंत्री अस्लम शेख यांचे तात्काळ कार्यवाहीचे आदेश
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः जलप्रदूषण मधून होणार्या माश्यांच्या मृत्यूवर आणि मच्छीमारांच्या नुकसानीबाबत मंत्री अस्लम शेख यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्याने मच्छिमार बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
ऑल इंडिया सी फेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन आणि नवी मुंबई मधील मच्छीमार बांधवांच्या शिष्टमंडळाने मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची भेट घेतली व नवी मुंबई परिसरातील कंपनी द्वारे खाडीच्या पाण्यात सोडल्या जाणार्या रासायनिक द्रव्याने रोज मृत्युमुखी पडणार्या लाखो माश्यांच्या मृत्यू बद्दल ची समस्या निदर्शनात आणून दिली. त्या वेळी मंत्री अस्लम शेख यांनी तात्काळ त्या गोष्टीवर संबंधित अधिकारी वर्गाला कार्यवाही चे आदेश दिले आहेत. त्या वेळी त्या शिष्टमंडळ मध्ये अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष अफजल देवळेकर, पराग मुंबरकर, महेश सुतार, रतिश भोईर उपस्थित होते.
निवेदन देताना मंत्री अस्लम शेख यांची भेट घेताना अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष अफजल देवळेकर, पराग मुंबरकर, महेश सुतार, रतिश भोईर