स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्यासह कुटुंबियांवर हल्ला
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर काल रात्री काही अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला.
पनवेल जवळील वडघर येथे महेश साळुंखे यांच्या राहत्या घरासमोर शुक्रवारी रात्री अज्ञात इसमांनी त्यांना तसेच त्यांची पत्नी सोनू यांना किरकोळ वादावरुन शिवीगाळ करून हाताच्या ठोशा बुक्क्यांनी व लाथांनी लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. तसेच त्यांना पाहून घेतो अशी धमकी सुद्धा दिली. याबाबत त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे युथ रिपब्लिकन पक्षप्रमुख मनोजभाई संसारे यांनी पनवेल येथे धाव घेवून संबंधित घटनेची माहिती घेवून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच पोलिसांनी तात्काळ संबंधित आरोपींना अटक करावी अशी मागणी केली आहे. यापुढे सुद्धा महेश साळुंखे व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी सुद्धा केली आहे.