यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रवेश मुदत वाढ आणि प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची विशेष सवलत
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः कोरोना विषाणूचे संकट आणि अवकाळी पाऊस यामुळे असंख्य विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असल्याने, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत 15 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाचा विचार करून, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क दोन टप्पात भरण्याची मुभा दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी यशवंत मेमोरियल ट्रस्ट पनवेल या विद्यापीठाच्या अधिकृत अभ्यासकेंद्रात 9819248771 / 9819540448 या भ्रमणध्वनींवर संपर्क साधावा. यशवंत मेमोरियल ट्रस्ट हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचे, 2008 पासून एमबीए, एम सीओएम, बीसीए, बी सीओएम, बीए, प्रिपरेटरी कोर्स, सर्टिफिकेट कोर्स इन पेशंट असिस्टंट, सर्टिफिकेट कोर्स इन अर्ली चाइल्डहुड केअर अॅण्ड एज्युकेशन या अभ्यासक्रमांचे अधिकृत अभ्यासकेंद्र असून त्याचा अभ्यासकेंद्र क्रमांक 3258अ हा आहे. अधिक माहिती साठी इच्छुकांनी वर नमूद केलेल्या भ्रमणध्वनींवर संपर्क साधावा.