इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेल तर्फे कौटुंबिक मानसिक स्वास्थ्यावर व्याख्यान
पनवेल, दि.४ (वार्ताहर) : जागतिक मानसिक आरोग्य दिनी इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलतर्फे अमली पदार्थांचे व्यसन आणि त्याचे कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
पुण्यातील प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार हे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. सध्याच्या काळातील ज्वलंत असलेला व सर्वांना भेडसावणारा विषय डॉक्टर जहागिरदार यांनी अगदी सोप्या भाषेत मांडला. व्यसन म्हणजे काय? ते का जडते व त्यावर मात कशी करावी? ह्या विषयांवर त्यांनी सविस्तरपणे चर्चा केली. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे शंकानिरसन केले. त्यांची ओळख क्लबच्या सेक्रेटरी ममता राजीवन ह्यांनी करून दिली.
क्लबच्या सेक्रेटरी ममता राजीवन ह्यांनी इनरव्हील प्रार्थना सादर केली. क्लबच्या मेंबर साधना धारगळकर ह्यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डिस्ट्रिक्ट 313 डीव्हीपी मुक्ती पानसे ह्यांची ओळख करुन दिली. क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंट कल्पना कोठारी ह्यांनी आभार प्रदर्शन केले. क्लबच्या डॉ. हेमा परमार व इतर सदस्यांची साथ लाभली.ह्या कार्यक्रमाला पदाधिकारी नगीना बोहारी व इतर क्लबच्या महिला उपस्थित होत्या. 56 महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. एकंदरीतच आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन ह्या कार्यक्रमानी उपस्थितांना दिला.