मुक्या,बहिऱ्या आणि आंधळ्या महाभकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या महाभकास आघाडी सरकारचा भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी जाहीर निषेध केला.रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी अटकेच्या निषेधार्थ अलिबाग इथे कलेक्टर ऑफिस समोर भाजयुमो च्या कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या तडाखेबंद भाषणात विक्रांत पाटील यांनी महाभागास आघाडीचे सरकारचे वाभाडे काढले.लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली पत्रकारिता याच्यावरच घाव घालण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आहे. आधी पालघर इथे साधूंच्या हत्येचं प्रकरण आणि आता २०१८ साली जी केस बंद झाली होती ती पुन्हा उकरून सूड भावनेने अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.अश्या प्रकारे कुठलीही नोटीस न देता अटक करणे हे आणिबाणीची आठवण करून देत आहे.अर्णब गोस्वामी हे सतत या महाभकास आघाडीच्या सरकारच्या कामकाज पद्धतीच्या दोषांवर बोट ठेवायचे काम करत होते,याचाच मनामध्ये राग धरून अर्णब गोस्वामी वर ही कथित कारवाई करण्यात आली आहे.शिवरायांच्या नावाने राजकारण करणारे पक्ष आज तुघलकी निर्णय घेत आहे,सत्य बोलणारे आणि सत्याची बाजू मांडणारी लोक हे आज या सरकारच्या डोळ्यात खुपायला लागली आहेत.राज्यातल्या इतर महत्त्वाच्या प्रश्नांना सोडून कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्यात हे सरकार मग्न आहे.आज आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आया-बहिणींवर कोविड सेंटर सारख्या ठिकाणी बलात्कार होत आहे. पण त्याबद्दल या सरकारला कुठलीही तमा नाही अजूनही आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्याऐवजी हे सरकार सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर कारवाई करत आहे.करोना रुग्ण संख्या महाराष्ट्र पहिल्या नंबर ला,मंदिरे बंद आहेत पण मदिरालय उघडले गेली आहेत.या महाभकास आघाडी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये दिवसेंदिवस रोष वाढत होत आहे आणि त्याचे परिणाम या सरकारला नक्कीच भोगावे लागणार आहेत.यापुढेही जर हे सरकार असेच तुघलकी आणि अन्याय पूर्वक निर्णय घेत राहिले तर भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि आणि या सरकारच्या मंत्र्यांना जागोजागी जाऊन घेराव घालतील असे प्रखर मत श्री विक्रांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
या वेळी सन्मा.प्रविणजी दरेकर विरोधीपक्ष नेता विधानपरिषद,मा.खा. किरीटजी सोमय्या,भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष व आमदार प्रशांतजी ठाकूर,भाजयुमो उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेशजी नेटकर आणि इतर मान्यवर व युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
