सिडकोच्या प्रकल्पातील घरकूल योजनेमधील घरांना मुद्रांक शुल्क 1 हजार आकारण्यात यावे शिवसेना महिला आघाडीच्या मागणीला यश
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः सिडकोच्या प्रकल्पग्रस्तातील घरकूल योजनेमधील घरांना शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे मुद्रांक शुल्क एक हजार आकारण्यात यावे अशी मागणी शिवसेना कळंबोली महिला आघाडी शहर संघटीका ज्योती राजेश मोहिते यांनी शासनाकडे तसेच खा.श्रीरंग बारणे यांच्याकडे केली होती. या मागणीला शासनाने सकारात्मक दुजोरा दिला आहे.
या संदर्भात ज्योती मोहिते यांनी शासनाकडे व सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केला. पत्रव्यवहार केला. या संदर्भात त्यांना खा.श्रीरंग बारणे यांचे सहकार्य लाभले. नुकतेच शासनाने परिपत्रकाप्रमाणे मुद्रांक शुल्क 1 हजार आकारण्यात यावे असे जाहीर केले असल्याने हा विजय शिवसेना महिला आघाडीचा असल्याचे ज्योती मोहिते यांनी सांगितले आहे.