माजी महापौर व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते आत्मनिर्भर प्रभाग १८ दिवाळी महोत्सव 2020 चे उदघाटन.
पनवेल/ प्रतिनिधी: माजी महापौर व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते आत्मनिर्भर प्रभाग १८ दिवाळी महोत्सव 2020 चे उदघाटन.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत व Vocal For Local या संकल्पनेतून आत्मनिर्भर प्रभाग १८ दिवाळी महोत्सव 2020* आयोजन गोखले हॉल येथे करण्यात आले आहे,या महोत्सवाचे उदघाटन श्री विक्रांत पाटील यांच्या हस्ते झाले.प्रभागातील नवउद्योजक-उद्योजिका,माता-भगिनी आणि युवा मित्र यांच्या स्वदेशी वस्तू व दिवाळी फराळ यांचे प्रदर्शन व विक्री ह्या दोन दिवसाच्या महोत्सवात करण्यात येणार आह. यावेळी बोलताना विक्रांत पाटील म्हणाले ही प्रभागातील नवउद्योजक उद्योजिका युवा मित्र माता-भगिनी यांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रभागातील नागरिकांना उत्तम प्रतीचे स्वदेशी वस्तू व खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी मिळतील आणि त्याचा फायदा प्रभागातील या उद्योजकांना मिळणार आहे.आज कोरोनामुळे उद्योजकांना आणि सामान्य नागरिकांना झळ सोसावी लागत आहे.त्यामुळे हा मोहत्सव या सर्व नवद्योजकांना स्फूर्ती देण्याचं काम करणार आहे. प्रभागातील कामांना नेहमीच तत्परतेने पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे त्याच बरोबर माझ्या प्रभागातील उद्योजकांन सुद्धा प्रोत्साहन मिळावा म्हणून अशा प्रकारचे आणखीन काय महोत्सव यापुढे मी आयोजित करणार आहे. माझी प्रभागातील लोकांना व तमाम पनवेलकर यांना विनंती आहे की या स्टॉलला आपण भेट द्यावी व या नवंउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे.