नवीन पनवेल महिलांसाठी आठवडा बाजार सुरू करण्यास जागेची उपलब्धता महानगरपालिकेने करून द्यावी नवीन पनवेल महिला शहर संघटीका अपूर्वा प्रभु
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः नवीन पनवेल महिलांसाठी आठवडा बाजार सुरू करण्यासाठी जागेची उपलब्धता पनवेल महानगरपालिकेने करून द्यावी अशी मागणी शिवसेना नवीन पनवेल महिला शहर संघटीका अपूर्वा प्रभु यांनी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेली प्रथम ती ही महिला सक्षमीकरण योजना पनवेल महानगर पालिका हद्दीत राबविण्यासाठी, नवीन पनवेल शहरात महिलांसाठी आठवडा बाजार भरविण्याकरिता जागेची उपलब्धता करून देण्याबाबत पनवेल महानगर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. महिला छोटे मोठे व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावून स्वतः ला सिद्ध करत आहेत. अशा होतकरू महिलांसाठी लवकरच आठवडा बाजार आपण उपलब्ध करून देवू असे आश्वासन सुद्धा आयुक्तांनी दिले आहे. तरी या आश्वासनांची लवकरात लवकर पुर्तता करावी अशी मागणी अपूर्वा प्रभु यांनी केली आहे.