पनवेल तालुक्यातील प्रलंवित शिवभोजन थाळी केंद्राना मंजूरी द्यावी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या अनेक धडाडीच्या निर्णयात शिवथाळी योजना सर्वसामान्य जनतेमध्ये प्रसिध्द आहे सुरवातीला शासनाने ग्रामीण भागात 75 ते 100 थाळी व शहरी भागात 125 ते 200 पर्यत थाळी कोटा निश्चित केलेला होता. सदर योजना कार्यन्वीत करण्यांसाठी अनेक इच्छूक उमेद्वार होते व त्यांनी शासनाकडे अर्ज केलेले आहेत . सध्या ते अर्ज शासन दरबारी योग्य त्या कारवाईसाठी प्रलंबित आहेत, तरी प्रलंबित शिवभोजन थाळी केंद्रांना मंजूरी द्यावी अशी मागणी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्हयासाठी 107 शिवथाळी केंद्राना 17,200 भोजन थाळया मंजूर केलेल्या असून 13000 ते 14000 हजार विक्री होत असून कमीत कमी 3000 हजार भोजन थाळया यापूर्वी सुध्दा शिल्लक आहेत. सध्या शासनाने मंजूर शिवथाळी केंद्राना 500 थाळयांचा कोटा कमी करून 200 भोजन थाळ्यांचा कोटा निश्चित करून दिलेला आहे. तसेच जिल्हयातील 107 शिवथाळी केंद्राना 17,300 भोजन थाळया मंजूर केलेल्या असून सध्याच्या परिस्थितीत फक्त 10,000 दहा हजार शिवभोजन थाळया विक्री होत आहेत. अशावेळी रायगड जिल्हयातील सरासरी 7,300 शिवभोजन थाळ्यांचा कोटा शासन दरबारी पडून आहे. शासकीय नियमानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शिवथाळी केंद्राची मागणी करणारे श्री.सद्गुरू अनुराधा माउली बचत गट , मु.काळुटे , ता.पनवेल व श्री ओंकार कॅटरर्स , कामोठे , ता.पनवेल ( भोजनालय आणि टिफीन सर्विस ) यांचे व इतर अर्जदारांचे अर्ज प्रलंबित आहेत ते हातावेगळे करून शिल्लक राहिलेल्या शिवभोजन थाळयांच्या योजनेत त्यांना सामावून घेवून पनवेल तालुक्यातील प्रलंबित शिवथाळी केंद्राना मंजूरी देवून योजनेचा लाभ देणेची विनंती पाटील यांनी केली आहे.
