एकता सामाजिक संस्थेच्या वतीने कर्नाळा किल्ला जवळील आदिवासी कुटुंबांना दिवाळीचे साहित्य वाटप
पनवेल दि.15 (वार्ताहर)-एकता सामाजिक संस्थेच्या वतीने कर्नाळा किल्ला जवळील आदिवासी कुटुंबियांना दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. चालू वर्ष सर्वांचेच अत्यंत बिकट असे गेले त्याला आदिवासी बांधव ही अपवाद नाहीत. लॉक डाऊन मुळे रोजंदारी बंद झाली त्यामुळे आदिवासी कुटुंब आर्थिक विवेचनात आहे. त्यात दिवाळी हा सण म्हणजे बच्चे कंपनीचा उत्साह अधिक असतो परंतु यावर्षी दिवाळी होणार की नाही अशी चिंता असताना कामोठे मधील एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक कामोठेकर एकत्र येऊन सर्वांनी मिळून एक मदतीचा हात म्हणून एक किलो मैदा, साखर, रवा आणि एक लिटर तेल असे किट तयार करून कोरलवाडी, माडभोम ठाकूरवाडी, घेरावाडी, तसेच येथील 158 आदिवासी कुटुंबाना देण्यात आला. तसेच ग्राम संवर्धन संचालित बालग्राम प्रकल्पातील 25 आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना दिवाळीचा फराळ, खाऊ, आणि थंडी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटस् देण्यात आली. कामोठे मधील आम्ही कामोठेकर या व्हॉट्स अप ग्रुप च्या माध्यमातून एकत्र येऊन आदिवासी बांधवांच्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न केला.