- कृष्णकुंजवर दीपारंभ दिवाळी अंकाचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
पनवेल, दि.17 (वार्ताहर): दिवाळी सणांमध्ये फराळा सोबतच वाचक वर्गाला उत्सुकता असते ती दिवाळी अंकाची. पहिल्या वहिल्या दीपारंभ या दिवाळी अंकाचे प्रकाशन मराठी हृदयसम्राट राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर करण्यात आले.
याप्रसंगी मनसेचे नेते संदीप देशपांडे, गजानन काळे, अक्षय काशिद व त्याचबरोबर मनसेचे अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. या दिवाळी अंकाची महत्त्वाची विशेष बाब सांगायची तर हा दिवाळी अंक 19 तारखेला होणार्या विदर्भ साहित्य संमेलनात सुद्धा वाचकांना पाहायला मिळणार आहे. या दिवाळी अंकात अनेक मान्यवर लेखकांनी आपले लिखाण केलेले आहे. फार कमी वेळात वाचकांच्या पसंतीत दीपारंभ दिवाळी अंक उतरलेला आहे. एकीकडे कोरोनाचे सावट असल्याने अनेक दिवाळी अंक यंदा प्रसिद्ध झाले नाही तर दुसरीकडे दीपारंभाचे संपादक हर्षल भदाणे पाटील यांच्या अथक परिश्रमातून दिवाळी अंक आला आहे व संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे. या दिवाळी अंकासाठी सौरव महाजन, शुभम पेडामकर, शिवाली जाधव, अक्षय काशिद ह्या संपूर्ण टीमने खूप हातभार लावून हा अंक यशस्वीरित्या संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवलेला आहे. तुम्हाला सुद्धा दीपारंभ दिवाळी अंक खरेदी करायचा असेल तर 9870993003/7972213844 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.