भर हिवाळ्यात तळोजा येथील सबवेमध्ये साचले पाणीरेल्वे आस्थापना विभागाकडून जनतेची घोर फसवणूक जनतेमध्ये प्रचंड नाराजी, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद ढगेपाटील यांचा आरो
तळोजा/वार्ताहर:गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळेला तळोजा फेज 1 येथील सबवे अखेर आठवड्यापूर्वी लोकार्पण करण्यात आला. विविध राजकीय पक्षांनी व राजकीय नेत्यांनी जनतेच्या गैरसोयीचा मुद्दा उचलत रेल्वे प्रशासनावर प्रचंड दबाव टाकून मार्ग जनतेसाठी खुला केला आणि विविध राजकीय पक्षांनी श्रेय लाटण्याच्या उद्घाटन व आनंदोत्सव साजरा केला. परंतु हा आनंदसोहळा जनतेमध्ये फार काळ टिकला नाही. सबवे मध्ये गेल्या दोन दिवसांपासून हळूहळू पाणी साचत गेले आणि सबवेला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. भर हिवाळ्यात सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, रेल्वे आस्थापना विभागाकडून जनतेची घोर फसवणूक केल्याचा घणाघातील आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद ढगे-पाटील यांनी केला आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे नजीकच्या खाडीतील भरतीचे पाणी जमिनीतून सबवेमध्ये घुसले. जेव्हाही लोकार्पणाची प्रक्रिया सुरू होती, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव प्रसाद ढगेपाटील यांनी लोईव्ह महाराष्ट्र 24 शी बोलताना वारंवार सांगितले होते की अद्याप सबवेच्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या नाहीत, सबवेमध्ये परमनंट सक्शन पंप बसवलेे गेलेले नाहीत. याशिवाय अन्य तांत्रिक गोष्टी अपूर्ण आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला काही वेळ द्यावा लागेल. शंभर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर लोकांच्यासाठी सुरक्षित असा सबवे खुला करता येईल. परंतु राजकीय श्रेयाच्या चढाओढीमध्ये व रेल्वे आस्थापना विभागाच्या दिरंगाईमुळे सदर काम अपूर्ण राहिले. उद्घाटनानंतर सुद्धा रेल्वे प्रशासनाने उर्वरित काम पूर्ण करण्यास दिरंगाई केली.
सबवेमध्ये अद्याप खालील कामे अपूर्ण आहेत… आवश्य उपाययोजना…
1) अजून सुद्धा काही प्रमाणात पाणी साचत आहे त्यामुळे पुढचा धोका ओळखून लवकरात लवकर सक्शन पंपची व्यवस्था व्हावी
2) पादचारी मार्गामधून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्गाची उपाययोजना करावी.
3) गतीने सबवेमध्ये जाणाऱ्या वाहनांना झेबरा क्रॉसिंग व निर्देशक फलक यांचा वापर व्हावा.
4) भरती आली की वॉटर लॉजिंग होते. पाणी सबवेमधे येऊन वाहतूकीस अडथळा होतो.
5) पाण्याचा निचरा होत नाही. त्यासंदर्भात उपाययोजनेची यंत्रणा बसवावी.
6) सबवेच्या बाहेरील रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावून घ्याव्यात. अंधारामुळे एक्सीडेंटचे प्रमाण वाढत आहे.
तात्पुरती उपाययोजना तकलादू
आज सकाळी प्रचंड साठलेले पाणी पाहून प्रसाद ढगेपाटील यांनी रेल्वे विद्युत अभियंता श्री यादव व आस्थापना अभियंता श्री निंबेकर यांच्याशी संपर्क केला असता सध्या साठलेले पाणी काढण्यासाठी संध्याकाळी टेम्पररी पंप ची व्यवस्था केली परंतु ही व्यवस्था तकलादू असून, फार धिम्या गतीने पाणी निचरा होते. त्यामुळे जनतेतून परमनंट सक्शन पंपची मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
वारंवार पाठपुरावा करून सुद्धा पंप बसवले गेले नाहीत. हा रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणाच म्हणावा लागेल. लवकरात लवकर सक्शन पंप व अन्य तांत्रिक बाबी पूर्ण करून सुरक्षित सबवे तळोजातील लोकांना रेल्वे प्रशासनाने द्यावा.
-प्रसाद सुभाष ढगेपाटील,
जिल्हा सचिव पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी