जुन्या वादाच्या रागातून ऑटो रिक्षा जाळली
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः जुन्या वादाचा राग मनात धरुन ऑटो रिक्षा जाळल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे.
फिर्यादी निखील निखारे यांच्या बरोबर असलेल्या जुन्या वादातून अजय डुकेवाल (22 रा.करंजाडे गाव) याने हनुमान मंदिराच्या जवळ उभी करून ठेवलेली ऑटो रिक्षा क्र.एमएच-46-एझेड-9052 हिला जाळून नुकसान केले आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सपोनि भोसले करीत आहेत.
![जुन्या वादाच्या रागातून ऑटो रिक्षा जाळली](http://worldfamenews.com/wp-content/uploads/2020/11/1542976116067.png)