आष्टीत बिबट्याची दहशत सुरुच, मंगरूळमध्ये पुन्हा माय-लेकावर हल्ला सुदैवाने जीव वाचला, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
आष्टी (बीड) : आष्टी शहराजवळील मंगरूळ येथे बिबट्याने माय-लेकावर हल्ला करून जखमी केले. सुदैवाने या हल्ल्यात जीवाला धोका झाला नाही. आज (शनिवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
शीलावती बाबा दिंडे (वय 42) व अभिषेक बाबा दिंडे (वय 12 वर्षे) हे माय-लेक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले. तुरीला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या या मायलेकावर तुरीच्या पिकातून येत बिबट्याने हल्ला चढविला. त्यात त्यांच्या हाताला व पायाला जखमा झाल्या. यावेळी आजूबाजूला अनेक शेतकरी होते. मोठा आरडाओरडा झाल्याने बिबट्या पळून गेला. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.