७ पिंजरे, ड्रोन कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे, १२५ कर्मचारी बिबट्याला पकडण्य्साठी तैनात
बिबट्याचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न
आष्टी : पाथर्डी तालुक्याच्या सरहद्दीवर नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असून आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत मागील चार दिवसांपासून चांगलीच वाढली आहे. दि.२४ रोजी सुरुडी येथील नागनाथ गर्जे यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला पुन्हा शुक्रवारी दि.२७ या बिबट्याने तालुक्यातील किन्ही गावातील एका ९ वर्षीय मुलाची शिकार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. आ.सुरेश धस यांनी सुद्धा नागरिकांना धीर दिला. दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी बबन गुंजाळ यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात गुंजाळ यांना कुठलीही दुखापत झाली नाही. या सर्व प्रकाराने दहशतीत असलेल्या नागरिकांनी आणखी किती बळी जाणार ? असा संतप्त सवाल करून नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा अथवा गोळ्या घाला अशी मागणी केली आहे.
तालुक्यात मागिल काही महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दि.२४ रोजी शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या नागनाथ गर्जे या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला चढवल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर शुक्रवारी दि.२७ दुपारी स्वराज सुनील भापकर हा मुलगा आपल्या काका कृष्णा हिंगे यांच्यासोबत शेतात गेला होता.यावेळी हिंगे हे तुरीला पाणी देण्यासाठी मोटर सुरु करण्यास गेले.त्यावेळी स्वराज हा त्यांच्यासोबत गेला. मात्र तिथे अगोदरच दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्वराजवर झडप मारली.यावेळी त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला स्वराजला शेतातून फरफटत घेऊन जात असताना कृष्णा हिंगे यांनी ग्रामस्थांना फोन करून घटनेची माहिती देत शेतात मदतीला येण्याचे आवाहन केले.यावेळी ग्रामस्थ शेतात जमल्यानंतर वन विभागाला याची माहिती देण्यात आली.दरम्यान शेतापासून काही अंतरावर स्वराजचा मृतदेह आढळून आला या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १२५ कर्मचारी,अमरावती व औरंगाबादचे विशेष पथके, बीड जिल्ह्यातील वनविगातील अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. परिसरात ७ पिंजरे लावण्यात आल्याची