अखेर…पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये कोरोना तपासणी सुरुराजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यशमहाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांचा पाठपुरावा
पनवेल,(प्रतिनिधी) — महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवली आहे. या अनुषंगाने पनवेल रेल्वे स्थानक व बस स्थानकात बाहेरून येणाऱ्या प्रवाश्याची कोरोना तपासणी करा आणि नंतरच पनवेल शहरात प्रवेश द्या, अशी मागणी राजे प्रतिष्ठाण कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त यांना पत्राद्वारे केली होती. या पात्राची दाखल घेत आरोग्य विभागाकडून शुक्रवार पासून प्रत्येक प्रवाश्याची कोरोना तपासणीला करण्याचे सुरु केले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर राज्य दिल्ली, गुजरात, याठिकाणी कोरोनाचा प्रसार वाढत असताना दिसत आहे. या अनुषंगाने राज्य सरकारने येथून येणाऱ्या प्रवाश्याची कोरोना तपासणी करूनच महाराष्ट्रात प्रवेश दिला जावा असे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. मात्र पनवेल परिसरात देखील बाहेरून रेल्वेने अथवा बस ने येणाऱ्या प्रवाश्याची संख्या जास्त आहे. यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात व बस स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवासी यांची कोरोना तपासणी करूनच पनवेल शहरात प्रवेश दिला जावा असे पात्र राजे प्रतिष्ठाण कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी या विषयाकडे लक्ष घालत पालिका आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल पालिका आयुक्त यांनी घेतली असून शुक्रवारपासून पनवेल रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या व बाहेरून येणाऱ्या प्रवाश्याची कोरोना तपासणी करूनच पनवेल परिसरात प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर एखाद्या प्रवाशाला करोना झाल्याचे आढळल्यास त्याला तात्काळ उपचारार्थ दाखल केले जात आहे. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाचे पथकांची नेमणून केली आहे.