दै. सामनाचे पनवेल प्रतिनिधी संजय चं. कदम यांना मुंबईच्या महापौर किशोरी ताई पेडणेकर यांच्या हस्ते सन्मानित
पनवेल /वार्ताहर: दै. सामनाचे पनवेल प्रतिनिधी संजय चं. कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या तर्फे कोव्हिडच्या महामारीत देखील व्यक्तिगत हितापेक्षा उच्च सेवा हे रोटरीचे ब्रीद प्रत्यक्ष आचरणात आणून समाजाची सेवा केल्याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी ताई पेडणेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच या वेळी रोटरी मेंबरशिप डायरेक्टर मंजू फडके, डिआरएफसी रो. डॉ. गिरीश गुणे, डिस्ट्रीक्ट चेअर आरसीसी रो. अनंत टिकोने, अध्यक्ष रो. रुपेश यादव, सचिव रो. बाळकृष्ण आंबेकर,उपस्थित होते.