रोटरी वोकेशनल अवॉर्ड ने कोविड योढ्यांचा सन्मान
पनवेल/ वार्ताहर : रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्यावतीने रविवार २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी रोटरी मेगा हेल्थ सेंटर, आणि ब्लड बँक हॉल, खांदा कॉलनी, पनवेल येथे ‘रोटरी वोकेशनल अवॉर्ड ने समाजातील कोविड महामारीत उत्कृष्ट सेवा दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्लबचे अध्यक्ष रो रुपेश यादव यांनी राष्ट्रगीताने केली.
या पुरस्कारांचे वितरण मुंबईच्या महापौर सौ. किशोरी ताई पेडणेकर, आय.पी.डी.जी., डी.आर.एफ.सी. रो.डॉ. गिरीश गुणे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या मेम्बरशीप डायरेक्टर रो. मंजू फडके, आर.सी.सी. डिस्ट्रिक्ट ३१३१ चेअर रो. अनंत टिकोने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
हे पुरस्कार पनवेल शहरातील डॉक्टरांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आले.
डॉ. राजीव बुधकर, डॉ. संतोष जाधव, डॉ. विजयकुमार कुलकर्णी, पनवेल महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, पनवेल उप जिल्हा रुग्णालयाचे डॉ. नागनाथ यमपल्ले तसेच महेश आणि दिपाली वर्तक (लॅब तंत्रज्ञ आणि सहाय्यक), संजय कदम(पत्रकार), अर्जुन चिंदलिया(स्वच्छता- सफाई व रुग्ण सेवा पनवेल महानगर पालिका), आणि शिवसहाय्य संस्था पनवेल यांना सन्मानित करण्यात आले. तसेच कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता विशेष उल्लेखनिय कामगिरीबद्दल मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांना रो. डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते क्लब तर्फे ‘रोटरी वोकेशनल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाबरोबरच रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या नविन आर.सी.सी. क्लबचे चार्टर, प्रेसिडेंट उदय धुमाळ यांना रो. अनंत टिकोने यांनी प्रदान केले.
तसेच रो. मंजू फडके यांच्या हस्ते क्लबच्या ७ नविन सभासदांना रोटरीच्या पिन प्रदान करण्यात आल्या. त्याच दरम्यान रोटरी फौंडेशनसाठी लेवल ४ चे डोनेशन दिल्याबद्दल रो. मधुकर नाईक यांना ‘पॉल हॅरिस फेलो’ या पिन ने गौरविण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन रो बाळकृष्ण आंबेकर, रो विजय गोरेगांवकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी रो दिलीप जाधव, इतर सर्व रोटरी व रोट्रॅक्ट सभासद यांनी विशेष मेहनत घेतली.
हा कार्यक्रमाचे नियोजन काही निमंत्रिकांसाहित सामाजिक व सुरक्षित अंतर ठेऊन करण्यात आले होते.