शिवसेनेच्या शहर संघटक ऍड. सुलक्षणा जगदाळे यांच्या वतीने महिलांसाठी घरगुती व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.
पनवेल / प्रतिनिधी ) : शिवसेना महिला आघाडी कामोठे शहर यांच्या वतीने महिलांना बचतगटासाठी घरगुती व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी महिला वर्ग उपस्थित होता. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना विजेता महिला मंचचे प्रा. कुमार शिरोले सर, सकाळ तनिष्का व्यसपिठाचे समन्वयक अभिषेक भोसले सर, शिवसेना महिला आघाडी कामोठे शहर संघटक अँड. सुलक्षणा जगदाळे मॅडम, सौ. आशा साळुंखे, सौ. वंदना फपाळे, सौ. संगीताताई पवार, सौ. पूनम जाधव, सौ. रुपाली ,सौ. वनिता साळवी, सौ. जयश्री पाटील, सौ. कल्पना झावरे, सौ. विनिता वामन, पूनम शिटवडकर यांच्यासह बहुसंख्येने महिलावर्ग उपस्थित होता सदर कार्यक्रमाचे आयोजन ऍड. सुलक्षणा जगदाळे यांनी केले होते.