श्री क्षेत्र मढी ता.पाथर्डी येथे गुरुवारी पहाटे भक्ष्यासह लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेलबंद
प्रतिनिधी : श्री क्षेत्र मढी ता.पाथर्डी येथे गुरुवारी पहाटे भक्ष्यासह लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेलबंदझाला.शेजारील पिंजऱ्या ऐवजी मुख्य पिंजऱ्यात च बोकड भक्ष्य ठेवण्याची वन विभागाची युक्ती कमालीची परिणामकारक ठरली.बुधवारी सायंकाळी पान तास वाडी घाट शिरस रस्त्यावर चैतन्य नगर भागातील रहिवासी खलील दाऊबा शेख यांचे पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली.त्या शिकारी चा झाडा झुडपातील माग काढत तिसगाव वन परिक्षेत्र अधिकारी कर्मचारी यांनी ठसे घेतले.त्यानुसार बिबट्या वावर हेरून पिंजरा लावला.नैसर्गिक छपरा प्रमाणे पिंजरा भक्ष ठेवून पाल्या पाचोळ्यानी पिंजरा झाकला.गुरुवारी दैनंदिन पाहणी करताना बिबट्या जेरबंद झाल्याचे आढळून आले.सकाळी आठ वाजता शेरी मळ्यातील अर्जुन मरकड यांचे शेत तलाव जवळील पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती सार्वत्रिक झाली.त्यानंतर ग्रामस्थांची तोबा गर्दी लोटली.गर्दी मुळे बिबट्या आणखीनच बिथरला. व डरकाळ्या टाकीत पिंजऱ्या ला धडका मारू लागला.सुरक्षे मुळे वन कर्मचाऱ्यानी तात्काळ त्याला अहमदनगर येथे हलविले.दरम्यान पडलेला बिबट्या नर जातीचा असल्याचा प्राथमिक लक्षणांवरून अंदाज आहे.तज्ञांचे तपासणी नंतर त्यावर शिककामोर्तब होईल.असे वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी लोकमत ला सांगितले. आमदरा पान तास वाडी चैतन्य नगर परिसरात च बिबट्या ने दोन बालके व काही पाळीव प्राण्यांची शिकार केली असल्याचे वास्तव आहे.त्यामुळं बहुचर्चित नरभक्षक बिबट्या हाच असल्याचा कयास बांधला जात आहे.